नांदगाव केंद्रीय शाळेची कोव्हीड १९ लसीकरण जनजाग्रती फेरी

नांदगाव केंद्रीय शाळेची कोव्हीड १९ लसीकरण जनजाग्रती फेरी

गावातील १८ वर्षापुढील नागरीकांना कोव्हीड१९ लस घेण्यास केले प्रेरीत…

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील कोविड१९ लसीकरणाचे १००% उद्दीष्ठ पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या सूचनेनुसार व शिक्षण विभाग पंचायत समिती लातूरचे गटशिक्षणाधिकारी संजय पंचगल्ले, शिक्षण विस्तारअधिकारी धनंराज गिते व केंद्रप्रमुख बालाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद केंद्रशाळा नांदगाव ता.लातूर च्या वतीने नागरीकांमध्ये जाग्रती होवून लसीकरणाचे १००% उद्दीष्ठ पूर्ण व्हावे म्हणून गावभागातून फेरी काढण्यात आली. या फेरीत कोविड लस घ्या दंडावर,कोरोना घेवू नका अंगावर. ताई, बाई, मावशी अक्का, कोविड लस घ्यायची बरंका आदी घोषणा देण्यात आल्या.

या फेरी दरम्यान गावातील चौकाचौकात व नागरीक,
महिला जास्त संख्येने असलेल्या ठिकाणी मुख्याध्यापक सोनाजी भंडारे व उपक्रमशिल शिक्षक नजीऊल्ला शेख यांनी नागरीकांना कोविड लसीकरणाचे महत्व व फायदे या बाबत माहिती सांगून जनजाग्रती केली. यावेळी शाळेतील शिक्षक , विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author