श्रीकृष्‍ण मधुमेह रूग्‍णालयामार्फत मोफत मधुमेह तपासणीयंत्र वाटप

श्रीकृष्‍ण मधुमेह रूग्‍णालयामार्फत मोफत मधुमेह तपासणीयंत्र वाटप

लातूर (प्रतिनिधी) : जागतीक मधुमेह दिनाच्‍या निमित्‍ताने पन्‍नासहून अधिक मधुमेह रूग्‍णांना मधुमेहाची तपासणी करणारे यंत्र श्रीकृष्‍ण मधुहेह रूग्‍णालयाच्‍या वतीने वाटप करण्‍यात आले असून आहार आणि व्‍यायाम याबाबत उपस्थित मधुमेह रूग्‍णांना मार्गदशनही करण्‍यात आले. याप्रसंगी नगरसेविका सौ. वर्षा शिरीष कुलकर्णी, नगरसेविका श्‍वेता लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.

लातूर येथील डॉ. गजानन गोंधळी यांच्‍या श्रीकृष्‍ण (डायबेटीक) मधुमेह रूग्‍णालयामार्फत जागतीक मधुमेह दिनाच्‍या निमित्‍ताने नगरसेविका सौ. वर्षा शिरीष कुलकर्णी, नगरसेविका श्‍वेता लोंढे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत मधुमेह आजाराबाबत मार्गदर्शन करण्‍यात आले. याप्रसंगी मधुमेह रूग्‍णांचे इंजेक्‍शन बंद करता येते का, अनुवंशीक मधुमेहापासून कसे वाचावे, औषध गोळया न घेता साखर नियंत्रणात ठेवता येते का याबाबत सविस्‍तर माहिती देवून महिलांचे आरोग्‍य निरोगी ठेवण्‍याबरोबरच गरोदरपणातील मधुमेहाबाबत याप्रसंगी डॉ. गजानन गोंधळी यांनी चर्चा केली.

यावेळी उपस्थित प्रमुख पाहूण्‍यांच्‍या हस्‍ते पन्‍नासहून अधिक मधुमेह रूग्‍णांना मधुमेहाची तपासणी करणारे यंत्र मोफत वाटप करण्‍यात आले. याप्रसंगी संगीता रणदाळे, विजय पाचंगे, गणेश भांदरगे, दिपक मुंडे, प्रशांत गरड, शितल कदम, पृथ्‍वीराज बिराजदार यांच्‍यासह मधुमेह रूग्‍ण मोठया संख्‍येने उपस्थित होते.

About The Author