जीएफसी थ्री स्टार व ओडीएफ ++ मानांकन मिळवत लातूरची सर्वोत्तम कामगिरी

जीएफसी थ्री स्टार व ओडीएफ ++ मानांकन मिळवत लातूरची सर्वोत्तम कामगिरी

महापौरांनी स्वच्छता कर्मचाऱ्यास दिला पुरस्कार स्वीकारण्याचा मान

देशभरातील मान्यवरांकडून महापौरांच्या सोहार्दाचे कौतुक

लातूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लातूर शहराने जीएफसी थ्री स्टार व ओडीएफ ++ मानांकन मिळवत देशात ३८ वा क्रमांक पटकावला.लातूर शहराची या अभियानातील आजवरची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.दिल्लीत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत शनिवारी (दि.२० नोव्हेंबर) या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी पालिकेच्या वतीने स्वतः हा पुरस्कार न स्वीकारता स्वच्छता कर्मचारी लताताई रसाळ यांना देश पातळीवरील हा पुरस्कार स्वीकारण्याचा सन्मान दिला.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लातूर शहराला प्रथमच जीएफसी थ्री स्टार मानांकन मिळाले.केंद्र सरकारच्या वतीने या अभियानाअंतर्गत पूर्वी सेव्हन स्टार,फाईव्ह स्टार व थ्री स्टार मानांकन देण्यात येणार होते पण ते रद्द करून सेव्हन स्टार ऐवजी फाईव्ह स्टार व फाइव्हस्टार ऐवजी थ्री स्टार मानांकन देण्यात आले.यात लातूर शहराने ३८ वा क्रमांक पटकावला.ही लातूर शहराची आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे.
यापूर्वीही लातूर शहराने देशात ३८ वा क्रमांक पटकावला होता पण त्या काळात ओडीएफ प्लस प्लस व जीएफसी मानांकन देण्यात येत नव्हते.आता हे मानांकन असल्याने लातूर शहराची कामगिरी सर्वोत्तम ठरली.
दिल्लीत विज्ञान भवन येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, शहरी विकास मंत्री हरदीपसिंह पुरी,शहरी विकास खात्याचे राज्यमंत्री, सचिव यांच्यासह छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेशसिंह बघेल यांचीही उपस्थिती होती.
लातूर शहराच्या वतीने महापौर विक्रांत गोजमगुंडे, मनपाच्या सहाय्यक आयुक्त मंजुषा गुरमे,स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे,रवी कांबळे,अक्रम शेख,सोनवणे, पर्यावरण सल्लागार राहुल बोबे,सुमित ओझा, ओमप्रकाश वैरागे पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी दिल्लीत उपस्थित होते.

महापौरांच्या सौहार्दाचे देशातील मान्यवरांकडून कौतुक….
लातूर शहराने स्वच्छतेच्या बाबतीत आजवरची सर्वोत्तम कामगिरी बजावल्याबद्दल दिल्लीत देश पातळीवरील पुरस्कार देऊन पालिकेचा गौरव करण्यात आला. मनपाच्या वतीने महापौर विक्रांत गोजमगुंडे व वरिष्ठ अधिकारी हा पुरस्कार स्वीकारतील असे अपेक्षित होते.परंतु महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी स्वच्छता कर्मचारी लताताई रसाळ यांना पुरस्कार स्वीकारण्याचा मान दिला.महापौरांच्या या सोहार्दतेचे कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या देशभरातील मान्यवरांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!