प्रा.मारोती बुद्रुक राज्यस्तरीय महात्मा फुले पुरस्काराने सन्मानित
अहमदपूर (गोविंद काळे) : सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील हिंदीचे प्राध्यापक प्रा.मारोती भीमराव बुद्रुक यांना राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने प्रोटान विभागीय राज्यस्तरीय अधिवेशनात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ विभागीय अधिवेशन प्रोटान आणि राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा नांदेड येथे संपन्न झाला. या सोहळ्याचे उद्घाटक शिक्षण सहसंचालक डॉ विठ्ठलराव मोरे,माजी शिक्षण संचालक नंदनजी नागरे,अध्यक्ष प्रोटान चे मुख्य संयोजक, डॉ मोहन मिसाळ इष्टाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब लोणे, टिपू सुलतान ब्रिगेडचे डॉ जहिरोद्दीन पठाण, प्रहार शिक्षक संघटनेचे एस.जी. चव्हाण, चंद्रकांत कुणके मराठा सेवा संघाचे पंडित कदम, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हा संघटक नामदेव कुटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांना राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नांदेड येथील प्रोटान विभागीय अधिवेशन संपन्न झाले समाजाला जागृत करण्यासाठी फुले,शाहू, आंबेडकरी आणि बहुजन संताच्या चळवळीच्या परिवर्तनवादी विचारधारेचा प्रचार प्रसार आणि प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या समाजाच्या कल्याणासाठी आणि उत्थानासाठी शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साठी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते,
प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी सामाजिक, सांस्कृतिक,धार्मिक, प्रबोधन क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केले आहे. व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांनी व्यसन मुक्ती ची चळवळ राबविली आहे ते पथनाट्यकार कवी लेखक गायक असून ते महाराष्ट्रातील प्रख्यात निवेदक आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन 2021 चा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांना मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातील मित्र परिवारांनी अभिनंदन केले आहे.