जिल्हा बँकेच्या निवडणूकीत दिलीपराव देशमुख व आ.धीरज देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क

जिल्हा बँकेच्या निवडणूकीत दिलीपराव देशमुख व आ.धीरज देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क

लातूर तहसील कार्यालयात केले मतदान

लातूर (प्रतिनिधी) : राज्यात नावलौकिक असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुक होत असून ९ जागेसाठी रविवारी मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे जिल्ह्यातील १० तालुक्यात मतदान केंद्रांवर त्या त्या तालुक्यातील मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत रविवारी सकाळी दहा वाजता राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी लातूर येथील तहसिल कार्यालयात येवून मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, ट्वेंटी १ शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, अँड किरण जाधव, अशोक गोविंदपुरकर, पृथ्वीराज शिरसाठ, राजकुमार पाटील, सौ सपना किसवे, कैलास पाटील, जगन्नाथ पाटील, मुन्ना उपाडे, प्रवीण पाटील, ज्ञानेश्वर भिसे, पालकर , संतोष देशमुख, रामदास पवार, पंडित कदम, रघुनाथ शिंदे, अजित काळदाते, आनंद पाटील, सुग्रीव पवार, हरिराम कुलकर्णी, रामराव पाटील, सुंदर पाटील कव्हेकर, मतदार बंधू आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author