लातूर जिल्हा बँकेच्या निवडणूकीत काँग्रेस प्रणित सहकार पॅनलचा दणदणीत विजय

लातूर जिल्हा बँकेच्या निवडणूकीत काँग्रेस प्रणित सहकार पॅनलचा दणदणीत विजय

१९ पैकी १८ जागेवर सहकार पॅनल चे उमेदवार विजयी

लातूर (प्रतिनिधी) : राज्यातील जिल्हा बँकेत अव्वल स्थानावर असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीत काँग्रेस प्रणित माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या सहकार पॅनल च्या उमेदवारांनी भाजपा प्रणित पॅनल उमेदवारांचा दणदणीत पराभव करत बँकेच्या १९ जागे पैकी १८ जागेवर सहकार पॅनल चे उमेदवार विजयी झाले आहेत तर देवणी तालुका सोसायटी मतदार संघातून सहकार पॅनल चे उमेदवार गोविंद भोपनिकर व भाजपा प्रणित विरोधी पक्षाचे उमेदवार भगवान पाटील तळेगावकर या दोघांना प्रत्येकी १७ मते समान पडल्याने निवडणुक अधिकारी यांनी दोघांची चिठ्ठी काढली त्यात भगवान पाटील तळेगावकर हे चिठ्ठी वर विजयी झाले आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपा प्रणित पॅनल उमेदवारांना मतदारांनी साफ नाकारले असून सहकार पॅनल चे मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पून्हा शिक्कामोर्तब करून सहकार पॅनल उमेदवारांना मतदारांनी स्वीकारले आहे. बँकेने केलेल्या ३५ वर्षात नेते दिलीपराव देशमुख यांच्या कार्याची ही विजयाची पावती आहे दरम्यान सहकार पॅनल उमेदवार मोठया मताधिक्याने निवडून येताच माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या आशियाना निवासस्थानी लोकांनी फटाक्याची आतषबाजी करत दिवाळी साजरी केली.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ जागेसाठी निवडणूक होती यापुर्वीच १० जागेवर सहकार पॅनल चे बिनविरोध निवडूण आलेले उमेदवार याप्रमाणे असून आमदार धीरज विलासराव देशमुख(प्रक्रिया मतदार संघ) आमदार बाबासाहेब पाटील (अहमदपूर), अशोकराव पाटील निलंगेकर (निलंगा), अँड श्रीपतराव काकडे (औसा), मारुती पांडे(जळकोट), एन आर पाटील (चाकुर), राजकुमार पाटील (लातूर), श्रीमती लक्ष्मीबाई चंद्रशेखर भोसले (उदगीर), अँड प्रमोद जाधव (रेणापूर), जयेश माने (मत्स्य सहकारी संस्था) हे १० उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने केवळ ९ जागेसाठी निवडणुक झाली सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली त्यात सहकार पॅनल चे उमेदवार व्यंकटराव पाटील बिरादार (शिरूर अनंतपाळ तालुका सोसायटी मतदार), पृथ्वीराज शिरसाठ (अनुसूचित जाती जमाती मतदार संघ), अशोक गोविंद पूरकर,(पतसंस्था मतदार संघ), दिलिप पाटिल नागराळकर (मजुर मतदार संघ), अनुप शेळके (ओबीसी मतदार संघ), सौ सपना किसवे (विशेष मागास प्रवर्ग), सौ अनिता केंद्रे (महीला मतदार संघ), सौ स्वयं प्रभा पाटील (महीला मतदार संघ) हे सर्व उमेदवार सहकार पॅनल चे विजयी झाले आहेत तर देवणी तालुका सोसायटी मतदार संघात सहकार पॅनल चे उमेदवार गोविंद भोपनिकर व भाजपा प्रणित पॅनल चे उमेदवार भगवान पाटील तळेगाव कर या दोघांना प्रत्येकी १७ समान मते पडल्याने दोघांच्या नावाने चिठ्ठी टाकण्यात आली त्यात भगवान पाटील तळेगावकर यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

हि तर विजयाची नांदी – दिलीपराव देशमुख

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीत सहकार पॅनल उमेदवारांना मतदारांनी मतदानाचा आशिर्वाद देऊन आमच्यावर विश्वास ठेवलेला असून मागच्या ३५ वर्षाच्या पारदर्शक कारभार च्या कामाची ही पावती असून ही विजयाची नांदी आहे अशी माहिती राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी आशियाना निवासस्थानी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

पुढें बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की राज्यात नव्हे देशात जिल्हा बँक पहील्या स्थानावर आहे बँकेने अतिशय चांगले निर्णय घेत गेल्या २५ वर्षात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता देण्याबरोबरच सहकार चळवळ उभी केली हे करीत असताना बँकेने पारदर्शक कारभार करीत सामाजिक बांधिलकी जपत विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी बँकेच्या वेगवेगळ्या योजनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचे काम केले यात राजकारण केले नाही मात्र विरोधी पक्षाच्या लोकांनी खोटे आरोप केले ते मतदारांनी मतदानाच्या पेटीतून साफ नाकारले असून सहकार पॅनल उमेदवारांना मोठया बहुमताने निवडून दिले आहे त्यांचा मी सर्वांचा आभार व्यक्त करून येणाऱ्या काळात लातूर जिल्हा बँक अधिक चांगल्या पद्धतीने योजना राबवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आवश्यक असेल त्या योजना राबवून एक लातूर बँक राज्यात अव्वल स्थानावर असलेल्या काही बँकेत लातूरचा समावेश असेल असे चांगले कार्य संचालक मंडळ करेल असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

About The Author