पुरोगामी महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नामविस्तारासाठी मोठा संघर्ष, लढा द्यावा लागला – प्रा. बालाजी आचार्य
अहमदपूर ( गोविंद काळे ) येथील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ, अरुण भाऊसाहेब वाघंबर आयोजित गोरगरिब महिलांना साडी-चोळी वाटप व शुभेच्छा कार्यक्रम घेण्यात आला. उद्घघाटन पर भाषणात प्रा. बालाजी आचार्य हे म्हणाले की औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देताना समाजसुधारकांच्या पुरोगामी महाराष्ट्रात १७ वर्ष मोठा संघर्ष करावा लागला आणि हे आजच्या पिढीला माहिती असणे फार म्हत्वाचे आणि गरजेचे आहे असे मत कार्यक्रमाचे उद्धघाटक प्रा. बालाजी आचार्य यांनी गुरुवार दि. १४ जानेवारी २०२१ रोजी मकर संक्राती, नामविस्तार दिन व सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने महिलांना साडी-चोळी वाटप व शुभेच्छा कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केले तत्पूर्वी साविञीबाई फुले, महात्मा फुले, छञपती शाहू, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुन आभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती सौ. गंगासागर जाभाडे या होत्या तर प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे, माजी नगरसेवक शाहुताई कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या शकुंतला बनसोडे, धम्मज्योती गायकवाड, रसिका बनसोडे, सुरेखा ससाने, द्रौपदीबाई कांबळे गंगाखेडकर, आदी महिलासह सामाजिक नेते श्रीकांत बनसोडे, युवा नेते प्रशांत कांबळे ,राहुल ढवळे, रुपेश कांबळे, जंगले, यांचीही उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर भाषण संयोजक/निमंञक अरुण भाऊसाहेब वाघंबर यांनी केले. उदघाटनपर भाषणात पुढे बोलताना प्रा आचार्य यांनी कर्मवीर भाऊसाहेब वाघबंर यांचा सामाजीक संघर्ष गायरान जमीन, मागासवर्गीयांना शिष्यवृत्ती आणि गोरगरीबावर होणाऱ्या अन्याय अत्याचारांच्या विरोधात लढा होता भाऊसाहेबांचा वारसा घेऊन फुले, शाहू आंबेडकरी विचार जिवंत ठेवण्यासाठी सामाजिक अभिनव उपक्रम म्हणून विविध कार्यक्रमाचे औचित्य साधून गोर -गरीब, पिडीत महिलाना 32 वर्षापासून अविरतपणे ग्रामीण व शहरी भागातील महिलांना साडी- चोळी वाटपाचा कार्यक्रम घेऊन मान्यवरांच्या शुभहस्ते वाटप केले जाते अशा कार्यक्रमातून सामाजिक चळवळ गतीमान करण्याचे कार्य वाघंबर परिवार सामाजिक चळवळीतुन करित आहे. नामातंर विद्यापीठाचा लढा हा स्वातंत्र्य, समता, एकता आणि बंधुत्वाचा सामाजिक संर्घषाचा, सलोख्याचा होता यात अनेकांना हुतात्मे पत्करावे लागले आणि बलिदान सुध्दा द्यावे लागले होते याची आठवण आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक कार्य आणि त्यांचे कर्तृत्व समाजाला समजावे आणि महापुरुषांना जातीत बंदिस्त न करता सर्व समाजाच्या हितासाठी असे काम करून संयुक्त कार्यक्रम घेणे उल्लेखनीय आहे असे विचार त्यानी आपल्या उद्घघाटनपर भाषणात मांडले. त्यानंतर मान्यवर सभापती गंगासागर जाभाडे, सरस्वती कांबळे ,शकुतला बनसोडे, शाहुबाई काबळे, अंजलीताई वाघबंर आदि महिलाच्या शुभहस्ते ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना साडी- चाळी ३५१ महिलांना वाटप करण्यात आले आणि अध्यक्षीय समारोप गंगासा गर जाभाडे यांनी केले या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संयोजक अरुणभाऊ भाऊसाहेब वाघंबर यांनी केले तर शेवटी आभार अंजलीताई वाघंबर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधव झुबरे,आकाश व्यवहारे, आदित्य वाघंबर, शुभम वाघंबर, सुमित वाघंबर, चंद्रकांत कांबळे, रितेश वाघंबर यांनी परिश्रम घेतले यावेळी दिवसभर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भीमशाहीर सोनबा सिरसाठ सुप्रसिद्ध भीमगीत गायीका प्रज्ञा लोखंडे आणि संच यांचा बुध्द- भीम गीताचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शहरातील व ग्रामीण भागातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.