भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते – गणेश दादा हाके पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष मा. गणेश दादा हाके पाटील प्रमुख मार्गदर्शिका सोनल रवींद्र पाटील जिल्हा परिषद शाळा तळवली तालुका रोहा जिल्हा रायगड, प्रमुख पाहुण्या डॉक्टर मीनाक्षी करणारे अध्यक्ष इनरव्हील क्लब अहमदपूर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे, मुख्याध्यापक उद्धव शृंगारे उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रथम प्रतिमापूजन करून ऑनलाइन मार्गदर्शनास सुरवात करण्यात आली.” भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते” असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच संस्थेचे अध्यक्ष गणेश दादा हाके पाटील म्हणाले ते पुढे बोलताना म्हणाले की बालवयातच योग्य ते संस्कार मुलांना दिल्याने पुढे असे स्वामी विवेकानंदा सारखे महान विचारवंत निर्माण होतील असे म्हणाले. यावेळी प्रथम प्रेमा वतनी मॅडम यांनी स्वागत गीत गायन करून उपस्थितांचे स्वागत केले. तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका सोनल पाटील मॅडम राज्य आदर्श शिक्षिका यांनी मा जिजाऊ यांचे बालपण, जीवन कार्य, शिवरायांवरील शिकवण, संस्कार तसेच स्वामी विवेकानंद यांच्या विषयी आपले विचार मार्गदर्शनातून व्यक्त केले या ऑनलाइन वेबिनारस जवळपास 100 हून अधिक विद्यार्थी व पालकांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीना तोवर यांनी केले सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी केले तर आभार आशा रोडगे यांनी मानले व त्रिगुणा मोरगे यांनी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता केली कार्यक्रमास शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.