दयानंद कलामध्ये हवाईसुंदरी व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि कोर्सेस कौन्सिलर करीअर(ccc) या नागपूर स्थित संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीना एव्हिएशन क्षेत्रांमध्ये पायलट क्रू मेंबर्स आणि ग्राउंड स्टाफ या क्षेत्रातील असलेल्या संधी आणि त्याच्या प्रशिक्षणाबाबत नागपूरच्या हेमंत सुटे मिस आंचल आणि मिस भूमिका कानेगावकर सविस्तर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले की, विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणासाठी इंग्रजी किंवा सायन्स शाखेचीच आवश्यकता नसून सदरील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानाबरोबरच विदेशी भाषा आत्मसात करणे गरजेचे आहे त्यामध्ये फ्रेंच, चायनीज जापनीज आणि अरबी सारख्या भाषा आत्मसात करणे गरजेचे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी भाषा शिकण्याची चिकाटी आणि आत्मविश्वास बाळगण्याची गरज आहे. यावेळी महाविद्यालयातर्फे प्रा. विलास कोमटवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर प्रा. जिगाजी बुद्रुके यांनी कार्यक्रमाचे समारोपीय भाषण केले तर आभार प्रदर्शन प्रा. महेश जंगापल्ले यांनी केले.
सदरील उपक्रमाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड व उपप्राचार्य अनिल कुमार माळी यांनी कौतुक केले आणि काळानुरूप अशा उपक्रमाची आवश्यकता असल्याचे सांगितले.