उमरगा येथील अज्ञात हल्लेखोरास तात्काळ अटक करण्यात यावी
मराठा सेवा संघ व छावाचे पोलिस अधिक्षकांना निवेदन
लातूर (प्रतिनिधी) : जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सहसचिव शिवमुर्ती सारीकाताई अंबूरे यांच्या मुलावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना उमरगा येथे घडली त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन मराठा सेवा संघ जिल्हा शाखा लातूर व अखील भारतीय छावा संघटनेच्यावतीने जिल्हा पोलिस अधिक्षकाकडे करण्यात आले.
उमरगा येथील रहिवासी व जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश महासचिव सारीकताई अंबुरे यांच्या 14 वर्षीय मुलावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली यामध्ये सारीकाताई अंबुरे यांच्या मुलाला गंभीर ईजा झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. यांच्या कुटुंबियांनाही अज्ञातांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे लातूरचे जिल्हा पालिस अधिक्षक यांना निवेदन देवून या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक व कुटुंबियांना तात्काळ संरक्षण देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन मराठा सेवा संघाचे जिल्हाअध्यक्ष प्रा.सुनील नावाडे, अखील भारतीय छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील, भगवान दादा माकने, आकाश पाटील, प्रा.उपाध्यक्ष लिंबराज सुर्यवंशी,आम्रपालिताई सुरवसे, प्रवीण देशमुख, खंडेराव गंगणे,संभाजी नवघरे, अमरदिप गुंजोटे,प्रशांत दुधभांडे, योगिता ठाकूर, अमोल माने, अमोल गायकवाड,जिजाऊ ब्रिगेड बोराडेबाई, माने ताई, सुजाता जाधव,मनीषा बोराडे आदींच्या उपस्थितीत जिल्हा पोलिस अधिक्षकांना देण्यात आले असून या प्रकरणी आरोपींना अटक नाही झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही निवेदनाद्वारे विजय घाडगे यांनी दिला. या निवेदनावर अनंत सुर्यवंशी, अभिमन्यु जगदाळे, पृथ्वीराज पवार यांच्यासह इतर पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.