महारानाप्रतापनगरच्या विजयी उमेदवारांचा माजी आ.कव्हेकरांच्या हस्ते सत्कार

महारानाप्रतापनगरच्या विजयी उमेदवारांचा माजी आ.कव्हेकरांच्या हस्ते सत्कार

लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील महाराणाप्रतापनगर ग्रामपंचातीच्या निवडणुकीत अतुल विजयकुमार गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन ग्रामविकास पॅनलचे 17 पैकी 5 उमेदवार विजयी झाले असून या विजयी उमेवारांचा सत्कार भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते मजगे नगर येथील कैलास निवासस्थानी करण्यात आला. यावेळी भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांची उपस्थिती होती.

लातूर तालुक्यातील महाराणाप्रतापनगर ग्रामपंचातीच्या निवडणुकीत परिवर्तन ग्रामविकास पॅनलचे 17 पैकी 5 उमेदवार विजय झाले यामध्ये कुमार विष्णू जाधव, सुनिता श्रीहरी कांबळे, शाहरूख नसुलसाब शेख, प्रिती नरेंद्र काळे, संजय विश्‍वनाथ आडे आदींचा समावेश आहे, या उमेदवारांना भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले. यावेळी भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर, अ‍ॅड.गणेश गोजमगुंडे यांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!