संगीतकार शैलेश चंद्र लोखंडे यांच्या “चतुर्थी” या गाण्याचे ध्वनिमुद्रण संपन्न

संगीतकार शैलेश चंद्र लोखंडे यांच्या "चतुर्थी" या गाण्याचे ध्वनिमुद्रण संपन्न

लातूर दि. : मराठी संगीत सृष्टीत उदयोन्मुख संगीतकार म्हणुन गाजत असलेलं नाव म्हणजे शैलेश चंद्र लोखंडे , मुळात लातूरच्या मातीत वाढलेला हा संगीतकार मुंबई सारख्या मोठ्या चित्रपट सृष्टीत आपल्या कलेच्या माध्यमातून नाव लौकिक मिळवत आहे।अनेक मोठमोठ्या गायकांनी या संगीतकाराची गाणी गायली आहेत. नुकतच त्यांच्या चतुर्थी या गाण्याचे रेकॉर्डिंग पार पडले. या गीताचे गायन अभय जोधपूरकर व संदीप उबाळे यांनी केले आहे।कन्नड,तामिली, तेलगू,मल्यालम, बंगाली हिंदी भाषेतील गीतांना आपल्या सुरेल आवाजाने मंत्रमुग्ध करणारा, अल्पावधीतच ज्याने हिंदी चित्रपट सृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. झिरो या चित्रपटाचे संगीतकार अजय अतुल यांचे जब तक जहाँ मे सूबह शाम है. व पानिपत या चित्रपटातील सपना है सच है। या सुपरहिट गाण्याचे ते गायक आहेत, असे अभय जोधपूरकर या गीताचे गायक आहेत. मराठी भावगीतलेखनासाठी ज्या नावाचा उल्लेख या संगीत विश्वात अतिशय आदराने घेतला जातो असे विदर्भीय कवी गझलकार अरुण सांगोळे हे या गीताचे ले गीतकार आहेत.

संगीतकार शैलेश चंद्र लोखंडे यांच्या "चतुर्थी" या गाण्याचे ध्वनिमुद्रण संपन्न

अभय जोधपूरकर यांचे समवेत स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील शिर्षकगीतासाठी ज्यांचा स्वर लाभला ते प्रसिद्ध गायक संदिप उबाळे यांचाही स्वर या गीताला लाभला आहे.
चतुर्थी या गाण्याचे संगीत संयोजनाची जबाबदारी अवी लोहार यांनी कुशलतेने पार पाडली. या गाण्याचे ताल संयोजन आदेश मोरे यांनी केले असून बासरी विजय तांबे यांनी वाजवली आहे.या गाण्याचे ध्वनीमुद्रण स्वरसंवाद स्टुडिओ ठाणे युफोनी स्टुडिओ अंधेरी वेस्ट,ए एम व्ही स्टुडिओ अंधेरी वेस्ट व पंचम स्टुडिओ पुणे या चार ठिकाणी पार पडले आहे.

संगीतकार शैलेश चंद्र लोखंडे यांच्या "चतुर्थी" या गाण्याचे ध्वनिमुद्रण संपन्न

या दोन्ही गायकांच्या आवाजातील सोज्वळता थेट हृदयाला भिडणारी असून गाणे हळुवारपणे आपल्या मनाची पकड घेते. या भक्तीगीतातील तीनही घटकांनी या निर्मितीत जीव ओतला आहे.गीतकार, संगीतकार आणि गायक या तिघांची कामगिरी आशयसंपन्नतेचा ठसा काळजावर नोंदविल्याची साक्ष पटते ।ललित संगीताने मोहित करून टाकणारी ही कलाकती संगीत प्रेमींच्या काळजाचा नक्कीच ठाव घेईल, अशी प्रतिक्रिया संगीतकार शैलेश चंद्र लोखंडे यांनी सदर प्रतिनिधीजवळ व्यक्त केली आहे.

हे गीत निर्मिती च्या अंतिम टप्प्यात असून लवकरच युट्युब व फेसबुक या माध्यमाद्वारे आपल्या पर्यंत पोचणार आहे.

About The Author