महात्मा फुले महाविद्यालयात साने गुरुजींची जयंती साजरी

महात्मा फुले महाविद्यालयात साने गुरुजींची जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : ” खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे”… अशी शिकवण देणारे, मातृहृदयाचे महन्मंगल स्त्रोत, थोर लेखक पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांची जयंती येथील महात्मा फुले महाविद्यालयात साजरी करण्यात आली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. नामदेवराव चामले मामा हे होते. तर किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे सचिव श्री. ज्ञानदेव झोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. डी.डी. चौधरी यांनी केले.सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले. या वेळी प्रो. डॉ. अनिल मुंढे, डॉ. अभिजीत मोरे, डॉ. डी. एन. माने, डॉ. संतोष पाटील, प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी ‘कोविड-१९’ च्या नियमांचे पालन करून उपस्थित होते.

About The Author