मोठी बातमी; अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचं दु खद निधन
पुणे (प्रतिनिधी) : अनाथांसाठी अहोरात्र सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यातील गॅलॅक्सी हॉस्पिटलमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने दि. 4 जानेवारी रोजी रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी निधन झाले. महिनाभरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता, तर 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होते.