ग्रामसेवक विष्णू भिसे यांची बदली करा; अन्यथा उपोषण करू
पाखरसांगवी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचा इशारा
लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील पाखरसांगवी येथील ग्रामसेवक विष्णू भिसे यांची बदली करा अन्यथा उपोषण करू असा इशारा पाखरसांगवी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी दिला आहे.
पाखरसांगवी येथील ग्रामसेवक भिसे हे सदस्यांना व ग्रामस्थांना विश्वासात न घेता काम करत असून व मंजूर झालेल्या कामाची आदलाबदली करून त्यांच्या सोयीप्रमाणे काम करत आहेत. गावातील विकास कामाची विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. माहिती अधिकारा मार्फत माहिती मागवली असता माहिती देण्यास टाळाटाळ करून मनमानी कारभार करत असून त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अन्यथा उपोषण करू असा इशारा पाखरसांगवी ग्रामस्थ व सदस्यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती लातूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दिला आहे.