मॅनेजरकडून कंपनीला ४ लाखांचा गंडा

मॅनेजरकडून कंपनीला ४ लाखांचा गंडा

पिंपरी (योगिता कोरे) : कंपनीतील असिस्टंट मॅनेजर ऑपरेटरने व्हेंडरकडून चार लाख ६७ हजार ६९८ रुपये घेऊन कंपनीची फसवणूक केली. ताथवडे येथील संघवी मूव्हर्स लिमिटेडच्या कार्यालयात २८ मे २०२० ते ९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.

गणेश बाळासाहेब माने (वय ३१, रा. मालखेड, जि. सातारा), असे गुन्हा दाखल झालेल्या असिस्टंट मॅनेजरचे नाव आहे. सागर अशोकराव नरवाडे (वय ३५, रा. रावेत) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी हे संघवी मूव्हर्स लिमिटेड या कंपनीत काम करतात. आरोपी त्याच कंपनीत काम करत होता. कंपनीने आरोपी गणेशला साईटवर कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी गाड्या भाड्याने घेणे व इतर कामांची जबाबदारी दिली आहे.

About The Author

error: Content is protected !!