धक्कादायक! कोल्ड्रिंक्समध्ये दारू पाजून विवाहित महिलेवर केला बलात्कार

धक्कादायक! कोल्ड्रिंक्समध्ये दारू पाजून विवाहित महिलेवर केला बलात्कार

पिंपरी (प्रकाश इगवे) : कोल्ड्रिंक्समध्ये दारू पाजून महिलेचे फोटो काढले. ते फोटो पती व नातेवाइकांना पाठवून बदनामीची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तळेगाव दाभाडे व चाकण येथे २० एप्रिल २०१९ ते २० ऑगस्ट २०२१ या कालावधीत ही घटना घडली. संदीप बुरुटे (रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पीडित महिलेने याप्रकरणी शुक्रवारी (दि. ७) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला वेळोवेळी कोल्ड्रिंक्समध्ये दारू पाजून फिर्यादीचे फोटो काढले.

About The Author

error: Content is protected !!