लोखंडी रॉडने मारून तरुणाला केले गंभीर जखमी

लोखंडी रॉडने मारून तरुणाला केले गंभीर जखमी

पिंपरी (प्रकाश इगवे) : मांडव डहाळाच्या कार्यक्रमातील भांडणाचा राग मनात धरून लोखंडी रॉडने मारून तरुणाला गंभीर जखमी केले. दिघी येथे गुरुवारी (दि. ६) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली. सचिन छगन जोहरे (वय २०, रा. साईपार्क, दिघी) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. त्यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. ७) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. योगेश मेदनकर (वय २७, रा. दिघी), ज्ञानेश्वर बांगर (वय २२), अमोल चोबे (वय २१) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली.

About The Author

error: Content is protected !!