संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे 17 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 12 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आलेल्या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयाचे सतरा (17) विद्यार्थी गुणवत्ता यादीत येऊन यशाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये नैतिक ज्ञानोबा उगिले 262 गुण विद्यालयातून प्रथम तर जिल्हयात आठवा,संस्कृती संजय पलमटे 260 गुण घेऊन, आरती अशोक मुंढे 260 गुण घेऊन विद्यालयातून द्वितीय तर जिल्ह्यातून दहावी आली आहे. विश्वजीत कपिलेश्वर ढोले 242 गुण, पृथ्वीराज परमेश्वर तिडके 232 गुण, स्वराज अरुण तिडके 228 गुण , श्रेयश रमेश सावरगावकर 228 गुण ,आदित्य माधव मुंढे 222 गुण , उत्कर्षा प्रफुल धामणगावकर 216 गुण, मुकुंद त्र्यंबक केंद्रे 206 गुण, ऋतुजा शिवाजी ढाकणे 204 गुण, मुकुंद ज्ञानोबा सुक्रे 204 गुण, अनुष्का तुकाराम हांडे 196 गुण, शुभम प्रल्हाद करंडे 194 गुण ,प्रतीक संतोष उगिले 194 गुण ,स्वप्निल लक्ष्मण येरमे 192 गुण, प्रांजल सचिन मुसणे 188 गुण घेऊन शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना सविता पाटील, शारदा तिरुके, श्री सतीश साबणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थाध्यक्ष गणेश दादा हाके पाटील ,संस्था समन्वयक श्री अमरदीप भैय्या हाके पाटील, संस्था सचिव रेखाताई तरडे, शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे, मुख्याध्यापक उद्धव श्रंगारे, मुख्याध्यापक परमेश्वर पाटील, बालाजी फुलमंटे सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. सत्कार समारंभाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आशा रोडगे-तत्तापुरे यांनी केले सुत्रसंचलन शारदा तिरुके यांनी तर आभार नंदकुमार मध्येवाड यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
