शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मुकेश कदम
महागाव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा हिवरा(संगम)च्या अध्यक्षपदी मुकेश मा. कदम तर उपाध्यक्षपदी रोहिदास घोगेवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शासन निर्देशांचे पालन करीत हिवरा(संगम)येथील जि.प.केंद्रीय उच्च प्राथ. मराठी शाळा येथे पालकांची सभा आयोजित करण्यात आली होती .यावेळी शाळा व्यवस्थापन समिती निवडी संदर्भात चर्चा होऊन नवीन शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात येवुन अध्यक्षपदी मुकेश मा. कदम,उपाध्यक्षपदी रोहिदास घोगेवाड यांची तर सदस्य म्हणुन गजानन ठमके,सौ.अंजली अंकुश कदम,सौ.गायत्री सुदर्शन लकडे,सौ.प्रगती प्रभाकर वानखेडे, सौ.भाग्यश्री सुनील चव्हाण,सौ.जोत्स्ना अशोक टिळेवाड,सौ.अश्विनी गणपत जामकर, सौ.रूपाली विकास धोतरकर,सौ.रेखा रा.कोत्ताकोंडावार,सुदाम मा.कदम,गजानन अ.मोरे,संतोष सु. जाधव,संदीप उ.कदम(शिक्षण तज्ञ),मुख्याध्यापक गोपाल बेदरकर(सचिव), चव्हाण सर(शिक्षक प्रतिनिधी) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या निवडीनंतर ग्रा.प.सदस्य पंजाबराव कदम,मावळते अध्यक्ष सुनिल चव्हाण यांनी नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे शाल व पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला.यावेळी माजी सरपंच डॉ.धोंडिराव बोरूळकर, पालक तथा ग्रा.प.सदस्या सौ.जयश्री राजेंद्र कदम,देविदास जाधव,नितीन वि. कदम,दत्तराव मदने,गजानन दि.कदम ,दत्ता बोडखे,दीपक बहिरमकर,गजानन भ.कदम,किरण जामकर,शाम कदम,किशन गिरी, स्वप्नील जाधव,पत्रकार विनोद खोंडे,महेश कामारकर, प्रकाश डांगे यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.