माजी पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

माजी पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

लातूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या टर्ममध्ये झालेल्या विकासकामाचा आलेख व स्थानिक नेतृत्त्व माजी कामगार कल्याण मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर, युवा मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून औसा रोड भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी माजी पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

यावेळी भाजयुमाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड.गणेश गोजमगुंडे, वैभव डोंगरे, राजेश पवार, चैतन्य फिस्के, गोविंद सूर्यवंशी यांच्यासह  रोहित चव्हाण, रवी वाघ, प्रविण कुसंगे, देवव्रत्त सिरसाठ, समर्थ पाटील, अभिषेक खिरेकर, आदित्य कारभारी, पार्थ क्षिरसागर, जुबेर सय्यद, अमन अली, अभी सरवदे, वैभव चामले, आदित्य गडगडे, ओमकार गडगडे, अथर्व सूर्यवंशी, शिव बिराजदार, सुश्रृत पाटील, शशांक गुजर, आदर्श स्वामी, रूतीक सावंत, वैभव जगताप, विनीत देशमुख, अभिनव चव्हाण, सिराज वाढवने, हर्षवर्धन चाटे, साहिल शेख, पृथ्वीराज पाटील व भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

औसा रोड भागातील भाजपा युमो झाला सक्रिय

भारतीय जनता पाटील युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्त्वाखाली युवा मोर्च्याचे काम सक्रियपणे दिसून येत आहे. दिवसेंदिवस होत असलेली कामाची व्याप्‍ती लक्षात घेऊन माजी कामगार कल्याण मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेऊन आकाश जाधव, रवी चव्हाण,हर्ष चव्हाण, अभिषेक  दिवटेकर, आदित्य कारभारी, रोहित कांबळे, श्रीकांत हाळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा युवा मोर्च्यात जाहीर प्रवेश केल्यामुळे औसा रोड भागातील भाजपायुमोे आता खूप सक्रिय झाला असल्याची चर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यातून चर्चेला येत आहे.

About The Author

error: Content is protected !!