चोरटे सुसाट; सहा दुचाकी चोरी

चोरटे सुसाट; सहा दुचाकी चोरी

पिंपरी (रफिक शेख) : चोरटे सुसाट असल्याने शहर परिसरात वाहनचोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून सहा वाहने चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहेत. याप्रकरणी बुधवारी (दि. १२) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आकाश दिलीप शिंदे (वय ३०, रा. इंदोरी, ता. मावळ) यांनी या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीची दुचाकी चोरीला गेली. सतीश शंकर नागावकर (वय ४६, रा. घरकुल, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीची दुचाकी चोरीला गेली. संदीप शिवाजीराव पाटील (वय ३२, रा. जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीची दुचाकी चोरीला गेली. सौरभ सुनील मडगे (वय २१) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीची दुचाकी बावधन येथून चोरीला गेली.

About The Author

error: Content is protected !!