खंडणीची मागणी करत 4 दुकानाची तोडफोड

खंडणीची मागणी करत 4 दुकानाची तोडफोड

पिंपरी (प्रकाश इगवे) : हप्ता चालू करण्याची मागणी करून धमकी देत कोयत्याने 4 दुकानाची आणि दोन वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी दोन अनोळखी तरुणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रुपीनगर येथील रुबाब मेन्स वेअर या दुकानात सोमवारी (दि. १०) रात्री पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली. रोहन चरणदास लोट (वय २४, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रुपीनगर येथील रुबाब मेन्स वेअर या कपड्यांच्या दुकानात काम करतात. दोन्ही अनोळखी आरोपी दुकानात आले. कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादीकडून हप्ता चालू करण्याची आरोपींनी मागणी केली. तसेच दुकानाची तोडफोड करण्याची धमकी दिली.

About The Author

error: Content is protected !!