डाॅ.हनुमंत धर्माकारे यांच्या हत्येची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी

डाॅ.हनुमंत धर्माकारे यांच्या हत्येची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी

अहमदपूर( गोविंद काळे )उमरखेड शहरातील प्रसिध्द बालरोगतज्ज्ञ डॉ. हनुमंत धर्माकारे यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी. या घटनेची सखोल उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई अशी मागणी येथील क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ (लसाकम) केली आहे. १४ जानेवारी रोजी तहसीलदार अहमदपूर मार्फत मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना या आशयाचे निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की,डाॅ.हनुमंत धर्माकारे हे उमरखेड शहरातील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. बालरोगतज्ज्ञ असलेले डाॅ.धर्माकारे हे अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. ११ जानेवारी रोजी सायंकाळी ४•३० वाजता अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.घटना घडून तीन दिवस झाले आहेत तरी उद्याप पोलीसांनी आरोपींना अटक केली. ही  निषेधार्थ घटना आहे. आरोपींना तात्काळ अटक करून या घटनेची उच्चस्तरीय सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे आहे.या निवेदनावर समाज कल्याणचे माजी सभापती ॲड.टि.एन कांबळे.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार प्राप्त उत्तमराव माने, जेष्ठ विधिज्ञ ॲड.आर.एस.वाघमारे,लसाकमचे मार्गदर्शक प्रा.दिलीप भालेराव, जिल्हा प्रवक्ते नरसिंग सांगवीकर, तालुकाध्यक्ष राजकुमार गोंटे, कार्याध्यक्ष विश्वांभर जिवारे, उपाध्यक्ष शिवाजीराव कांबळे,तालुका संघटक नामदेव अर्जुने,रोहन माने आदींच्या स्वाक्षरी आहेत. 

About The Author