३७ वर्षीय महिलेवर तरुणाने केला बलात्कार

३७ वर्षीय महिलेवर तरुणाने केला बलात्कार

पिंपरी (रफिक शेख) : ब्यूटिपार्लरचा व्यवसाय करणाऱ्या घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर महिलेसोबत वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. महिलेकडून ऑनलाइनद्वारे पैसे घेतले. तसेच तिच्या घरातील तीन लाखांचे दागिने घेऊन फसवणूक केली याप्रकरणी उच्चशिक्षित एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ऑगस्ट २०१९ ते १४ जानेवारी २०२२ या कालावधीत पिळे सौदागर येथे ही घटना घडली.

दीपक आत्माराम शेंडगे (रा. सरी) २०१९ याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने शुक्रवारी (६. १४) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पीडित फिर्यादी महिला ३० सप्टेंबर रोजी घरी नसताना फिर्यादीने त्याच्याकडील चावीने घर उघडून घरातून तीन लाख रुपये सोन्याचे दागिने फिर्यादीच्या नकळत घेतले. तसेच ते दागिने परत न देता फसवणूक करून अपहार केला. तुझे फोटो माझ्याकडे आहेत, ते मी तुझ्या घरच्यांना शेअर करेल, असे बोलून आरोपीने फिर्यादी महिलेला धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.

About The Author

error: Content is protected !!