सिद्धेश्वर मंदिराराचे कुलूप तोडून चांदीचे त्रिशूल व मखर चोरीला

सिद्धेश्वर मंदिराराचे कुलूप तोडून चांदीचे त्रिशूल व मखर चोरीला

भुलेश्वर (प्रकाश इगवे) : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नवसाला पावणारे, जागृत देवस्थान व भाविकांचे श्रद्धास्थान असणारे नायगाव येथील श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी मंदिरात चोरी झाल्याची घटना (शुक्रवारी, दि. १४) रोजी मध्यरात्री घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे दरवाजे, कुलूप तोडून मंदिरातील चांदीचे त्रिशूल व. चांदीचे मखर (महिरप) अंदाजे रक्कम ४,६७,५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. या मंदिरात दुसऱ्यांदा चोरी झाल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. नायगाव येथील सिद्धेश्वर मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात दर्शनासाठी गर्दी होत असते. गुरुवारी (दि. १३) रात्री १० च्या दरम्यान येथील पुजारी पोपट जगताप यांनी मंदिरातील मंडपाचे व गाभाऱ्याचे दरवाजे बंद केले व मंदिरालगत असणाऱ्या खोलीत झोपण्यासाठी गेले. शुक्रवार (दि. १४) पहाटे पाचच्या दरम्यान दर्शनासाठी गेले असता त्यांना मंडपाचे व गाभाऱ्याचे कुलूप तुटलेले दिसले. आत गेल्यानंतर त्यांना चांदीचे त्रिशूल व चांदीचे मखर चोरी झाल्याचे दिसून आले.

About The Author

error: Content is protected !!