एटीएम मशिनची तोडफोड करून चोरीचा प्रयत्न

एटीएम मशिनची तोडफोड करून चोरीचा प्रयत्न

पुणे (प्रकाश इगवे) : शहरातील वेगवेगळ्या भागांत चोरट्यांनी बँकांच्या एटीएम मशीनची तोडफोड करून रोकड लांबविण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. कोंढव्यातील साईनगर परिसरात उन्नती हेरिटेज सोसायटीत तळमजल्यावर बँक ऑफ बडोदाचे एटीएम केंद्र आहे. चोरट्यांनी पहाटे ३ च्या सुमारास एटीएम केंद्रात प्रवेश केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व एटीएम मशीन तोडफोड केली. एटीएम यंत्रातून रोकड काढण्याचा चे प्रयत्न केला. एटीएम केंद्रातील बॅटरीची वायर तोडण्यात आली. एटीएम – मशीनमधून पैसे न काढता आल्याने चोरटे पसार झाले. एटीएम मशीनची तोडफोड झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी बँक ऑफ बडोदाचे शाखा व्यवस्थापक राहुल नायर यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खडकी बाजार परिसरातील एचडीएफसी बँकेच्या एटीएम केंद्राची तोडफोड करून रोकड चोरीचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एटीएम केंद्राची देखभाल करणारी कंपनीतील कर्मचारी उमेश लामखडे यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोघा चोरट्यांनी दुपारी दीड वाजेच्या सुमारास खडकी बाजार येथील एका एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला.

About The Author

error: Content is protected !!