गुन्हा दाखल होऊन पाच दिवस उलटले तरी 354 च्या गुन्ह्यातील आरोपी अद्याप फरार

गुन्हा दाखल होऊन पाच दिवस उलटले तरी 354 च्या गुन्ह्यातील आरोपी अद्याप फरार

गातेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

लातूर (प्रतिनिधी) : गातेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटगाव येथील युवकाने एका पिडीतेचा विनयभंग करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दि. 11 जानेवारी रोजी घडली. या प्रकरणी पिडीतीने गातेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या रीतसर तक्रारी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पकडण्यात गातेगाव पोलीस मात्र अपयशी ठरलेले दिसत आहेत. गुन्हा दाखल होऊन पाच दिवस उलटले तरी 354 च्या गुन्ह्यातील आरोपी मात्र अद्याप फरार आहे.

मिळालेली माहिती अशी की, दि. 11 जानेवारी रोजी गातेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटगाव येथील संतोष नरसिंग कापसे या युवकाने रात्री 1 वाजण्याच्या सुमारास एका पिडीत फिर्यादीच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून वाईट हेतुने अंगाशी झोंबाझोंबी केली व जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादी ने दि. 12 जानेवारी रोजी सदर पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेची रितसर फिर्याद दिली. फिर्यादी ने दिलेल्या फिर्यादी वरुन गातेगाव पोलीस ठाण्यात गुरनं 03/2022 कलम 354 (अ), 452, 506 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊन पाच दिवस उलटले तरी आरोपी मात्र पोलीसांच्या हाती लागला नाही. पोलीसांनी आरोपीचा शोध घेतला असता गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार असल्याची माहिती गातेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी ए.बी.घारगे यांनी दिली आहे.

About The Author

error: Content is protected !!