पुण्यातील कल्याणीनगर मधील हॉटेल युनिकॉर्न हाऊस मध्ये कोरोना नियमांची पायमल्ली! पोलीसाचे दुर्लक्ष?

पुण्यातील कल्याणीनगर मधील हॉटेल युनिकॉर्न हाऊस मध्ये कोरोना नियमांची पायमल्ली! पोलीसाचे दुर्लक्ष?

पुणे (रफिक शेख) : पुण्यातील उच्चशिक्षीत भागात लेटनाईट चालणाऱ्या हॉटेल पब कडुन कोरोना नियमांची पायम ल्ली केली जात असुन पायमल्ली करणाऱ्याना . पाठीशी घालण्या चा प्रकार सुरू असल्याचे दिसुन येत आहे.मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी वारंवार नागरीकांना आव्हान करत असले तरी आज पुणे शहरातील शेकडो हॉटेल पब मध्ये कोरोना च्या नियमांना केराची टोपली दाखवली जात आहे. ऐकीकडे मास्क वापरणे बंधन कारक केले असताना ही कल्याणीनगर मधील हॉटेल युनिकॉर्न हाऊस मध्ये सर्वच्या सर्व नियम धाब्यावर बसविले जात असताना येरवडा पोलीसांचे याकडे दुर्लक्ष का होत आहे? हॉटेल युनिर्कार्न हाऊस गेल्या दोन – तीन दिवसांपासुन जोरदार पार्ट्या सुरू आहेत. गेल्या दोन दिवसां पूर्वी युनिकॉर्न हाऊस मध्ये ” लोहडी” या सणाची पार्टी जोमात झाली तर काल शनिवारी रात्री पार्टी जोमात पार पडली.विना मास्क विना सोशल डिस्टन्स आणि मोठी गर्दी उसल्याचे दिसुन आले आप आपल्या हद्दीत कोरोना नियमाची पायमल्ली व १४४ कलमांचे उल्लघन होत आहे का ?असे काही प्रकार घडत आहेत का? हे पाहण्याचे काम पोलीसाचे व महानगर पालिकेचे असताना दोघाही यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे लेट नाईट पाटर्या सुरू असुन याच्याने कोरोना वाढत नाही का? का हे कोणत्या तरी मोठ्या हस्तकाचे हॉटेल असेल म्हणुन कारवाई केली नाही जात नाही? असा प्रश्न नागरीकानी उपस्थित केला आहे.

About The Author

error: Content is protected !!