पुण्यातून अपहरण झालेला लहानगा अखेर आईच्या कुशीत ; १८ दिवसानंतर लागला शोध
पुणे (रफिक शेख) : डॉक्टर दाम्पत्याच्या चार वर्षीय मुलाचे ११ जानेवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास अपहरण झाले होते. घरासमोर मुलगा खेळत असताना त्याचे अपहरण करण्यात आले होते हा सर्वप्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे मात्र त्याचे अपहरण नेमक्या कोणत्या कारणातुन झाले हे मात्र अद्याप समजु शकले नाही. पुनावळे येथील क्रियेटिव्ह ऑरचिड या सोसायटीचे सुरक्षा रक्षक दादाराव जाधव वय ७० यांच्याकडे आरोपीने मुलाला सोपवले व तेथून पळ काढला जाधव यांनी मुलाच्या बॅगवरील नंबरवर फोन करून माहिती दिली.त्यानुसार वाकड आणि हिंजवडी पोलीसांनी घटना स्थळी धाव घेत मुलाला ताब्यात घेतले. मागील आठ दिवसापासुन पुणे पोलीस पिंपरी चिंचवड पोलीसांची पथके मुलाचा शोध घेत होते . पोलीस दलातील अतिवरिष्ठ अधिकारी या घटनेवर जातीने लक्ष ठेवून होते.