बनावट कागदपत्रांद्वारे बँकेकडून कर्ज घेत ७३ लाखांची फसवणूक

बनावट कागदपत्रांद्वारे बँकेकडून कर्ज घेत ७३ लाखांची फसवणूक

पिंपरी (रफिक शेख) : बनावट कागदपत्र सादर करून फ्लॅटवर कर्ज घेतले. कर्जाची माहिती न देता तो फ्लॅट विकला. त्यानंतर तोच फ्लॅट कोलॅटरल सिक्युरिटी ठेवून त्यावर साडेनऊ लाखांचे कर्ज घेतले. एकूण ७३ लाख ५० हजारांची बँकेची फसवणूक केली. साऊथ इंडियन बँक, कस्पटे वस्ती, वाकड येथे ही घटना घडली. बँक मॅनेजर निकिता गिरीश राऊत (वय ३१) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार विष्णू रामदास घुगे, प्रिया विष्णू घुगे, प्रवीण शिंदे (तिघे रा. बळीराज कॉलनी, रहाटणी), आशिष अभय पोतदार, अनुष्का आशिष पोतदार यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

About The Author