पुरस्कारातून काम करण्याची प्रेरणा मिळते – डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी
अहमदपूर (गोविंद काळे) : सामाजीक क्षेत्रात काम करताना केलेल्या कामाची कोणी तरी दखल घेतली पाहीजे किंबहुना कामाबद्दल केलेला सत्कार,दिलेला पुरस्कार हा अधिक जोमाने काम करण्यास प्रोत्साहित करते आणी इतरांना प्रेरणा मिळते असे प्रतिपादन युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले. येथील संस्कृती मंगल कार्यालय येथे रेल्वे सल्लागार समीतीचे सदस्य धनराज गूट्टे यांना नूकताच सेवा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्रीवेणी नगराच्या वतीने आयोजीत त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून कार्यकारी सभापती प्रशांत जाभाडे, नगरसेवक अभय मिरकले, मुख्य अभियंता बालाजी गुट्टे,प्रा.रमेशजी गुट्टे,चंद्रशेखर भालेराव ऋत्वीक गलाले सरपंच विक्रमजी गूट्टे, जायभाये साहेब, बालाजी शिंदे, काथवटे सर, मुख्याध्यापक कदम सर रमेश गूट्टे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पूढे बोलताना डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी म्हणाले की,सध्या चळवळीत स्वतःला झोकून देऊन काम करणार्या कार्यकर्त्यांची कमतरता असून हल्ली कार्यकर्त्यांची व्याख्या बदलली आहे की काय असे चित्र असून कार्यकर्त्यांनी जर लमनावर घेवून चळवळीत काम केले तर समस्या सुटायला वेळ लागणार नाही.धनराजजी गूटूटे सारख्या चळवळीतील कार्यकर्त्यांने भविष्यात लोकशाही पद्धतीने एखादा मतदार संघ डोळ्या पूढे ठेवून काम केल्यास येथील मतदार भरभरून पाठींबा देतील. सध्या सर्वत्रच युवकांचा राजकारणात ट्रेन्ड असून भविष्यात येथील युवकच राजकारणातील महत्वाच्या पदावर काम करण्यात अग्रणी असतील.
या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना वंजारी समाजभूषण पुरस्कार विजेते धनराज गूट्टे म्हणाले की,कुठल्याही सत्कारपेक्षा आपल्या गावातील तसेच आपल्या माणसाच्या हस्ते होणारा सत्कार महत्वाचा असून यातून अधीक जबाबदारी वाढते,महाविद्यालयीन जीवना पासून चळवळीत कार्यरत असून सबंध महाराष्ट्र भर समाजाच्या विविध प्रश्नावर अंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवत असून प्रश्नांची सोडवणूक करत आहे. प्रसंगी लाठ्या काठ्या खावून,जेल मध्ये जावुन अंदोलन करतो आहे. या पूढील काळात सूध्दा अधीक जोमाने काम करणार असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन मुंडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. व्यंकटराव इप्पर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मित्रपरीवारने सहकार्य केले.