मातृभाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येकांनी संवेदनशील असले पाहिजे – उपप्राचार्य डॉ. चौधरी

मातृभाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येकांनी संवेदनशील असले पाहिजे - उपप्राचार्य डॉ. चौधरी

अहमदपूर (गोविंद काळे) : मातृभाषेतूनच आपली ओळख होते मातीचीच भाषा मातीचीच भूमीच्या संवर्धनासाठी आणि ज्ञानभाषा मराठी रोजगार निर्मितीची भाषा व्हावी यासाठी मातृभाषेच्या संवर्धनासाठी आपण संवेदनशील असले पाहिजे असे प्रतिपादन अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रो. डॉ. दुर्गादास चौधरी यांनी केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचालित महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरच्या मराठी विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासन व उच्च शिक्षण विभाग यांच्या आदेशान्वये गुगल मीट या दूरदृश्य प्रणालीद्वारे ‘मराठी भाषा संवर्धन काळाची गरज ‘ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ‘ उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, सातवहानाच्या काळापासुन ते यादव काळ, छत्रपती शिवाजी महारांच्या काळात मराठीला राजाश्रय प्राप्त झाला होता . त्यावेळी मराठी केवळ राजभाषाच नव्हती तर ती रोजगाराची भाषा होती म्हणुन आज मराठीला केवळ राजभाषेपुरतीच मर्यादित असता कामा नये तर मराठी भाषा रोजगार देणारी भाषा व्हावी ही जबाबदारी सर्व मराठी भाषिकांची आहे असेही ते म्हणाले .

अध्यक्षीय समारोपाप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, जो पर्यंत माय हा शब्द जिवन्त आहे तो पर्यंत मराठी अबादित राहील. मराठी आपल्या संस्कृतीची भाषा आहे म्हणून तिचे संवर्धन करणे गरजेचे आहे तसेच मराठी भाषेची शुद्धता जपली पाहिजे त्यासाठी प्राचीन कविंच्या, साहित्यिकाच्या साहित्याचा अन्वयार्थ लावून त्याचे संशोधन करून ते साहित्य नव्या पिढी पर्यंत पोहचविले पाहिजे असे ही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय प्रो. डॉ. अनिल मुंढे यांनी करून दिला तर सूत्रसंचलन डॉ.मारोती कसाब यांनी केले तर आभार कु. संजीवनी येडले ने मानले. यावेळी ऑनलाईन आभासी पध्दतीने मराठी भाषेचे अभ्यासक, संशोधक, महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

About The Author