अकरा लाखांचा गुटखा जप्त

आळेफाटा (प्रकाश इगवे) : गुटख्याची वाहतूक करत असलेल्या कारचा आळेफाटा. पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करत प्रतिबंधित गुटखा व कार असा अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक केली. पोलिसांनी ही कारवाई पुणे-नाशिक महामार्गावर परिसरात रविवारी (दि.२३) पहाटे केली. शैलेश शशिकांत बनकर (वय ३६, रा. रानमळा, कडूस, ता. खेड) व सचिन सखाराम सांडभोर (वय ३५, रा. दोंदे, ता.. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आळेफाटा पोलिसांनी सांगितले की, आज मध्यरात्री दोन वाजता पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस हवालदार लहानू बांगर व पी. ए. शिंदे परिसरात पुणे-नाशिक महामार्गावर गस्त घालत असताना रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ नाशिक बाजूने येणारी कार यावरील चालकाने पोलीस गाडी पाहून कारचा वेग वाढवला.

About The Author

error: Content is protected !!