पैसे देण्यास नकार; दोघा भावांवर वार
पुणे (रफिक शेख) : पैसे देण्यास नकार दिल्यांच्या रागातून दोघांनी सख्ख्या भावांवर कोयत्याने वार केले. या घटनेत दोघे भाऊ गंभीर जखमी झाले. ही घटना • शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास खडकी येथील गवळी वाडा वसाहत येथे घडली. याप्रकरणी अमित जगताप यांनी फिर्याद दिली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी व आरोपी हे एकाच परिसरात राहतात. शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी, त्यांचे भाऊ सुमित व मित्र सोनू सारवान असे तिघे गप्पा मारत थांबले होते.
