प्रेमविवाह केलेल्या तरुणीचे अपहरण

प्रेमविवाह केलेल्या तरुणीचे अपहरण

त्नीच्या नातेवाईकांविरोधात पतीची तक्रार

पिंपरी (प्रकाश इगवे) : उच्चशिक्षित २१ वर्षीय तरुणीने तिच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. त्यामुळे तिच्या आई- वडील व इतर नातेवाइकांनी तरुणीचे अपहरण केले. धावडेवस्ती, भोसरी येथे रविवारी दुपारी ही घटना घडली.

चार महिलांसह आठ जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अपहरण झालेल्या विवाहितेच्या २३ वर्षीय पतीने याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मजुरी करतात. तर अपहरण झालेली फिर्यादीची पत्नी

महाविद्यालयीन उच्चशिक्षण घेत आहे. तीन आठवड्यांपूर्वी फिर्यादी आणि अपहरण झालेल्या तरुणीचा प्रेमविवाह झाला. मात्र या विवाहाला पत्नीच्या नातेवाईकांचा विरोध आहे. या गुन्ह्यातील आरोपी हे फिर्यादीच्या पत्नीचे नातेवाईक आहेत. त्यांनी रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास फोन करून फिर्यादीच्या पत्नीला भेटण्यासाठी बाहेर रस्त्यावर बोलविले. त्यावेळी फिर्यादी, त्यांची पत्नी आणि आई हे तिघेजण रस्त्यावर आले. त्यावेळी फिर्यादीच्या पत्नीचे नातेवाईक एका चारचाकी वाहनातून तेथे आले. त्यांनी फिर्यादीला व त्यांच्या आईला धक्काबुक्की केली.

About The Author

error: Content is protected !!