तू इथला भाई झालास का, म्हणून विनाकारण मारहाण

तू इथला भाई झालास का, म्हणून विनाकारण मारहाण

चिखलीमधील घटना: दोन जणांवर गुन्हा

पिंपरी (प्रकाश इगवे) : तू इथला भाई झालास का असे म्हणून एकाला विनाकारण मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भीमशक्तीनगर, मोरेवस्ती, चिखली येथे शुक्रवारी (दि.२१) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. सचिन आनंदा रनपिसे (वय ३६, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि.२४) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रोशन संघपाल नंदागवळी (वय २३) व त्याचा एक साथीदार (रा. मोरेवस्ती, चिखली)

यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भीमशक्तीनगर येथे एका दुकानाच्या बाजूला थांबले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी फिर्यादीला विनाकारण शिवीगाळ केली. तुम्ही मला शिवीगाळ का करता, असे फिर्यादीने विचारले. तू इथला भाई झालास का, असे आरोपी रोशन म्हणाला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला पकडून बोळीत ओढून नेले. लाकडी दांडक्याने मारहाण करून फिर्यादीला गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत नमूद आहे. उपनिरीक्षक रघुनाथ भोये तपास करीत आहेत.

About The Author

error: Content is protected !!