कर्ज देण्याच्या बहाण्याने महिलांची फसवणूक
पिंपरी (रफिक शेख) : महिला बचत गटांना फायनान्समार्फत कर्ज मिळवून देतो, असे सांगून, आठ लाख ६५ हजार ४९० रुपयांची फसवणूक केली. स्वाभिमानी फायनान्स, आकुर्डी येथे मे २०२१ ते १ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. अभिजित प्रकाश दाभाडे (वय ४४, रा. नवनाथ चौक, आकुर्डी) यांनी या प्रकरणी सोमवारी (दि.२४) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. विकास रघुनाथ बांदल (रा. नन्हे आंबेगाव, पुणे, मूळगाव अंधेरी वेस्ट, मुंबई), विलास वामन पाटील (रा. खराळवाडी, कामगारनगर, पिंपरी, मूळ रा. सुरे, ता. शिंदखेडा, जि. धुळे) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरुपती कार्पोरेशन अँड जीवन संजीवन ग्रुपचे संचालकं आरोपी विकास बांदल व अकाउंट मॅनेजर विलास पाटील यांनी फिर्यादीला त्यांच्या स्वाभिमानी फायनांन्समार्फत आठ महिला बचत गटांमधील ८० महिलांना कर्ज मंजूर करून देतो, असे सांगितले. कर्ज मंजूर करून घेण्याचे आश्वासन आरोपींनी दिले. त्या २१ मधील ७ कर्जदारांकडून पुढील कर्ज मंजुरीच्या प्रोसेससाठी एकूण तीन लाख ८०,०९० रुपये घेतले.
