कोयत्याचा धाक दाखवून सोनसाखळी हिसकावली

कोयत्याचा धाक दाखवून सोनसाखळी हिसकावली

पिंपरी (प्रकाश इगवे) : टपली मारून दुचाकीस्वार तरुणाला थांबवले. त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवून त्याच्या गळ्यातील एक लाख ४० हजार ९०० रुपये किमतीची सोनसाखळी जबरदस्तीने काढून घेतली. मावळ तालुक्यातील सांगवडे येथे शुक्रवारी (दि. २१) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी १७ वर्षीय तरुणाने सोमवारी (दि. २४) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तीन अज्ञात इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र हे दोघे फिर्यादीच्या दुचाकीवरून जात होते. त्यावेळी पाठीमागून तीन आरोपी त्यांच्या दुचाकीवरून आले. त्यातील एका आरोपीने फिर्यादीला टपली मारून थांबवले. त्यानंतर आरोपींनी त्यांची दुचाकी फिर्यादीच्या दुचाकीसमोर उभी केली.

About The Author

error: Content is protected !!