मित्राच्या पत्नीसोबत अश्लील फोटो एडिट करून केली बदनामी

मित्राच्या पत्नीसोबत अश्लील फोटो एडिट करून केली बदनामी

पिंपरी (रफिक शेख) : मित्राच्या पत्नीसोबत अश्लील फोटो एडिट करून व्हॉट्सअॅपवर पाठवून बदनामी केली. तसेच पैसे दिले नाही, तर आणखी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. देहू रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ ते २४ जानेवारी या कालावधीत हा प्रकार घडला. या प्रकरणी एका ३९ वर्षीय व्यक्तीने सोमवार, २४ जानेवारी रोजी देहू रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मोबाईल नंबरवर आरोपीने वेळोवेळी फोन करून तीन व पाच हजार रुपयांची मागणी केली. फिर्यादीने पैसे दिले नाहीत. त्यामुळे आरोपीने फिर्यादीच्या मित्राची पत्नी आणि फिर्यादी यांचा अश्लील फोटो एडिट केला. फिर्यादीच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील १५ नंबरवरील व्हॉट्सअॅपवर एडिट केलेला फोटो पाठवून आरोपीने बदनामी केली. पैसे दिले नाहीत, तर मी अजून तुमच्या मित्रांना तुमचे फोटो व्हायरल करील, अशी धमकीही आरोपीने दिली.

About The Author

error: Content is protected !!