घरफोडी करून चोरट्याने 92 हजाराचा माल लंपास केला

घरफोडी करून चोरट्याने 92 हजाराचा माल लंपास केला

पिंपरी (प्रकाश इगवे) : घराच्या दरवाजाच्या चुंबकाला चावी लावून ठेवणे महागात पडले आहे. अज्ञात चोरट्याने त्या चावीच्या साह्याने दरवाजा उघडून घरातून लॅपटॉप व मोबाइल चोरून नेला. उद्यमनगर पिंपरी येथे रविवारी (दि. २३) रात्री पावणेदहा ते अकरा या कालावधीत घरफोडीची ही घटना घडली. ओमकार शिवाजीराव गवळी (वय २०, रा. उद्यमनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. २४) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे राहत्या घराचा दरवाजा बंद करून चावी लोखंडी दरवाजाच्या आतील बाजूच्या चुंबकाला लावून जेवण करण्यासाठी बाहेर गेले. त्या वेळी अज्ञात चोरट्याने चुंबकाल लावून ठेवलेली चावी काढून घेऊन दरवाजा उघडला. घरात प्रवेश करून घरातून दोन लॅपटॉप व मोबाईल, असा ९२ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

About The Author

error: Content is protected !!