रामनाथ विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त गुणीजनांचा सत्कार संपन्न

रामनाथ विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त गुणीजनांचा सत्कार संपन्न

आलमला (प्रतिनिधी) : रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला तालुका औसा येथे दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालयात सकाळी ठीक 8.00वाजता रामनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट उमेश पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणात सन 2020-21 मध्ये गुणवत्ता मिळवलेल्या एस.एस.सी, एच.एस.सी. व स्पर्धा परीक्षेतील गुणवंताचा व आदर्श शिक्षकांचा सत्कार समारंभ संपन्न करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विश्‍वनाथ बिराजदार चेअरमन वि.का.स. सोसायटी आलमला गावचे सरपंच कैलास निलंगेकर पोलीस पाटील सुरेंद्र पाटील संपादक महादेव कुंभार, तलाठी भागवत सोनवते संस्थेचे सचिव प्रभाकर कापसे, औसा पंचायत समितीच्या सभापती अर्चना गायकवाड, मुख्याध्यापिका सौ अनिता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणीजनांचा गावचे सुपुत्र मुंबई पोलीस किरण लांडगे यांच्या सौजन्याने दिलेल्या ट्राफि पुष्पहारचे सर्व गुणवंतांचा, उत्तम प्रशासन म्हणून मुख्याध्यापिका सौ अनिता पाटील यांचा तसेच आदर्श शिक्षक म्हणून पर्यवेक्षक आवटे ए.आय. प्राध्यापक अशोक कदम व सेवक जगन्नाथ अंबुलगे यांचा आदर्श कर्मचारी म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच प्रमुख पाहुणे श्री महादेव कुंभार यांनी गुणवंतांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात एस.एस.सी. परीक्षेतील गुणवंत कु. बिराजदार पल्लवी, कु. बेरुळे वैष्णवी, कु. गुंजोटीकर वैष्णवी, सरवदे अजय, चव्हाण बालाजी, एच. एस.सी. परीक्षेत कु.कांबळे धरती, कु. पवार आरती, तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत मुलांनी सादिक, कु.मुलानी तनाज या गुणवंत विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचे रामनाथ शिक्षण संस्थेच्या स्टाप च्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना भारतीय सविधानाची शपथ दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पी सी पाटील यांनी केले तर आभार अंबुलगे रंगनाथ यांनी मांडले. या कार्यक्रमास विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!