गोडाऊन फोडून तीन लाखांचा माल लंपास

गोडाऊन फोडून तीन लाखांचा माल लंपास

पिंपरी (प्रकाश इगवे) : अज्ञात चोरट्यांनी दुकाने फोडून लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला. यात तीन लाख १३ हजार ४०९ रुपयांचा किराणामाल तसेच रोकड चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी वाकड आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.२८) घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले. सुजाराम वेनाराम सिरवी (वय ३८, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिरवी यांचे काळेवाडी येथील शिवाजी चौक येथे नॅशनल ट्रेडर्स नावाचे किराणा मालाचे दुकान तसेच गोडाऊन आहे. फिर्यादीने गुरुवारी (दि.२७) रात्री साडेनऊच्या सुमारास दुकान व गोडाऊन बंद केले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे शटर उचकटून तीन लाख १३ हजार ४०९ रुपये किमतीचा किराणामाल व फिर्यादीच्या खात्यामधील ट्रांजेक्शनद्वारे ८० हजार रुपये असा एकूण तीन लाख ९३ हजार ४०९ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आला.

About The Author

error: Content is protected !!