ट्रक अडवून मागितली १५ हजारांची खंडणी

ट्रक अडवून मागितली १५ हजारांची खंडणी

पिंपरी (रफिक शेख) : टाइल्स घेऊन जात असलेल्या ट्रकला अडवून पंधरा हजार रुपयांची मागणी केली. तसेच कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली. गोदरेज प्रॉपर्टीज साईटच्या गेटवर मामुर्डी, देहूरोड येथे शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. सुमित अरुण राऊत (वय २९, रा. मामुर्डी, ता. हवेली) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बाबा चव्हाण, सोमनाथ गडदे, नवीन (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. आरोपींनी ट्रक अडवून कंपनीत खाली होणाऱ्या प्रत्येक गाडीमागे आम्हाला पंधरा हजार रुपये द्यायचे. नाही तर तुम्हाला गाड्या खाली करू देणार नाही, अशी धमकीही दिली. फिर्यादी सुमित राऊत यांनी याप्रकरणी तक्रार केली. त्यानुसार खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

About The Author

error: Content is protected !!