बाजार समितीच्या सूरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने विद्यमान सभापतींनी राजीनामा द्यावा
अजितसिंह पाटील कव्हेकरांच्या उपस्थीतीत आडत व्यापार्यांची मागणी
लातूर (प्रतिनिधी) : देशातील बाजार समित्यामध्ये नावलौकिक मिळविलेल्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रातील तब्बल चार दूकाने अज्ञान चोरट्यांनी फोडली असल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत माहिती मिळूनही लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतींनी साधी भेट देऊन या घटनेची चौकशी देखील केली नाही. परिणामी बाजार समितीतील सूरक्षाही रामभरोसेच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करून बाजार समितीला कुलूप ठोकून भारतीय जनता पार्टीच्या व्यापार्यासह इतर व्यापार्यांच्यावतीने भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत निदेर्शने आंदोलने करण्यात आली.
लातूर बाजार समितीच्या बँकेमध्ये कोट्यावधीच्या ठेवी आहेत. अनेक व्यापार्यांची आडत दूकाने असल्याने त्यांचाही व्यवहार मोठा आहे तसेच सूरक्षेपोटी गोळा केला जाणारा कर कुठल्या कामावर खर्च करतात हाही संशोधनाचा प्रश्न आहे. यापूर्वीही आडत बाजारात चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. हा पूर्वीच्या घडामोडीचा इतिहास पाहता आडत बाजारात सी.सी.टी.व्ही.कॅमेर्याची संख्या वाढविण्याचीही मोठी गरज आहे. त्यामुळे याकडे बाजार समिती प्रशासनाने लक्ष घालून व्यापार्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु या बाबीकडे बाजार समिती प्रशासनाचे दूर्लक्ष होत आहे. परिणामी मार्केट यार्डातील दुकानफोडीच्या घटना कायम वाढतच आहेत. रविवारी मध्यरात्री झालेल्या दूकानफोडीमध्ये दीपक फावडे यांच्या आडत दूकानातून 25 हजार रूपये, बजाज यांच्या आडत दूकानातून 7 हजार रूपये तर मेळकूंदे यांच्या दूकानातून 10 कट्टे तूर किम्मत अंदाजे 35 हजार व सूर्यवंशी यांच्या दूकानातून किरकोळ चोरी करून अज्ञान चोरट्यांनी 67 हजाराचा मुद्देमाल चोरून पोबारा केल्याची घटना घडली. एवढी मोठी घटना घडूनही बाजार समितीचे सभापती,उपसभापती, सचिव तथा संचालक मंडळांनी दूकानाला साधी भेटही दिलेली नाही. बाजार समितीतील सुरक्षेचा कारभार राम भरोसे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपा व्यापार महासंघाच्यावतीने भारतीय जनता युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत बाजार समितीला कुलूप ठोकून निदर्शने करण्यात आली. यावेळी आडत व्यापारी दीपक फावडे, मेळकुंदे आप्पा, सूर्यवंशी, बजाज, दिलीप पाटील मसलगेकर, संतोष जाधव, किशोर घार, शिवराज केंद्रे, शरण अंकलकोटे, भालचंद्र दानाई, अजय दूडिले, शिवशरण थंबा, लक्ष्मण राऊत दीपक बजाज, दत्ता गंभीरे यांच्यासह भाजपासह इतर व्यापार्यांची उपस्थिती होती.
सभापतींच्या उपस्थितीत आज तोडगा निघणार बाजार समिती कार्यक्षेत्रातील चार दूकाने अज्ञान चोरट्यांनी फोडली असल्याीच घटना घडली परंतु बाजार समितीच्या प्रशासनाने साधी भेटही दिलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आडत व्यापार्यांनी भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत बाजार समितीला कूलूप ठोकून सूरक्षा व्यवस्थेचा प्रश्न धारेवर धरून निदर्शने केली. दरम्यान बाजार समितीचे सहसचिव भोसले व शिंदे यांनी भेट घेऊन सभापती ललीत शहा यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता याबाबत योग्य तो तोडगा काढू असे आश्वासन दिल्यामुळे बाजार समिती कार्यक्षेत्रातील आंदोलन तात्पूरते थांबवण्यात आले.