महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने कान्होपात्रा क्षीरसागर यांचा सत्कार संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी कान्होपात्रा सखाराम क्षीरसागर यांना नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ने सन्मानपूर्वक मानव्य विद्या शाखेची मराठी विषयात शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च अशी पीएच.डी. ( विद्यावाचस्पती ) ही पदवी प्रदान केली. या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, कान्होपात्रा क्षीरसागर यांनी परळी वैजनाथ येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्रो. डॉ. राजकुमार यल्लावाड यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ डॉ.शैला लोहिया यांच्या समग्र साहित्याचा विवेचक अभ्यास ‘ या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद च्या मानव्य विद्याशाखेत मराठी विषयातील शोधप्रबंध सादर केला होता. नूकतीच त्यांना पीएच.डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी ह.भ.प. प्रो. डॉ. अनिल मुंढे, डॉ. सतिश ससाणे, डॉ.मारोती कसाब, डॉ.पांडुरंग चिलगर, ग्रंथपाल प्रा.परमेश्वर इंगळे , डॉ. संतोष पाटील, प्रशांत डोंगळीकर आदी उपस्थित होत. तसेच डॉ. कान्होपात्रा क्षीरसागर यांच्या यशाबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे पदाधिकारी यांनी तसेच महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी व सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी तसेच आजी माजी विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.