राष्ट्रीय मतदार दिवस – राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे निकाल उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार यांच्या हस्ते

राष्ट्रीय मतदार दिवस - राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे निकाल उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार यांच्या हस्ते

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य” २५ जानेवारी ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ या दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय आँनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे आँनलाईन निकाल यूटूबच्या माध्यमातून सेलुचे उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार यांच्या हस्ते जाहीर करण्यात आले. मतदार जनजागृती व्हावी, याबाबत महत्व पटावे.समाजात जनजागृती व्हावी,सामाजिक मूल्य रुजवावे,कलागुणांना वाव मिळावे यासाठी सृजन स्स्थेच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.सदरील स्पर्धा निःशुल्क होती. या स्पर्धेतील सहभागी प्रत्येक स्पर्धकाला ई- सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सदरील स्पर्धा दोन गटात होती. लहान गटातून प्रथम -सिद्धी राम भिसे रायगड, द्वितीय -आयुष्य विजय चव्हाण सातारा,तृतीय- ज्ञानेश्वरी सुरेश घोडके जालना तर मोठा गटातून प्रथम- नंदिनी शंकर वानखेडे वाशिम,द्वितीय- तृप्ती शिवाजी वानखेडे वाशिम, द्वितीय-क्रांती देविदास वाघमारे लातूर, तृतीय- प्रियांका जनार्दन गडकरी मुंबई ,तृतीय-अंजली साहेबराव घुगे उस्मानाबाद,तृतीय-मुक्ता संतोष वानखेडे वाशिम या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकाविला आहे. स्पर्धेच्या माध्यमातून शाळा बंदच्या काळात विद्यार्थ्यांना आँनलाईन व्यासपीठ निर्माण करुन देण्यात आले. सदरील स्पर्धा ही आँनलाईन पद्धतीने राबविण्यात आली.सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ई-प्रमाणपत्र व गुणवंत विद्यार्थ्यांना फोन पे द्वारे रोख रक्कम व गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी किरण खमितकर, केदार खमितकर महादेव खळुरे, अविनाश धडे, शिवकुमार पवार, मल्लपा खळुरे, सलिम आतार, अमोल काळे, शमिका बांदेकर, पद्मा कळसकर आदिनी परिश्रम घेतले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्य आँनलाईन स्पर्धा यशस्वीपणे राबविल्याबद्दल तसेच स्पर्धेतील सर्व सहभागी व गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच सृजन सेवाभावी संस्थेचे उपजिल्हाधिकारी यांनी अभिनंदन व कौतुक केले.

About The Author