यशवंत विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन

यशवंत विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत विद्यालयात ३० जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम चे आयोजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही व्ही गंपले, उपमुख्याध्यापक रमाकांत कोंडलवाडे, पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, पर्यवेक्षक दिलीप गुळवे, उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी भाषण, गीत गायन, वेशभूषा, स्वालंबन, स्वच्छता या उपक्रमात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना सहशिक्षिका मधुबाला आंधळे, श्री लक्ष्मण फड, के.डी. बिरादार यांनी मार्गदर्शन केले अध्यक्षीय समारोप प्राचार्य वाघंबर गंपले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी तर आभार शरद करकनाळे यांनी मांडले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते

About The Author

error: Content is protected !!