आरोग्य अधिकारी डाँ सुनिल दासरे यांचा शिक्षकांनी केला वाढदिवस साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दासरे यांचा ४० वा वाढदिवस होम आयसोलेशन मधील रुग्णास समुपदेशन करणारे तसेच डाटा इंट्री व लसीकरण झाल्याचे सर्वेक्षण करणारे समुपदेशक म्हणून काम करणारे तालुक्यातील शिक्षक बांधवांच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य कार्यालय येथील कर्मचारी आरोग्य सहाय्यक आर.एम.गुंडरे, विस्तार आधिकारी एस.बी.पवार,श्रीमती लटपटे, तालुका लेखापाल मनोज कप्पीकेरे, कनिष्ठ सहाय्यक कांतराव जवणे,तालुका समुह संघटक संजय बानापूरे,टीबीएचव्ही प्रविण नखाते,परिचय श्रीराम मुंढे यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन एम.एस.खळुरे एच.बी.वलसे, एन.बी.सुरनर, सी. व्ही.मिरजगावे,एस.पी.मरवले, व्ही.जी.सांगुळे, आर.बी.राठोड, एम.व्ही वडवळे, एन.एम.पठाण, एन. एस.केरले, एम बी. गायकवाड, व्ही डी.केंद्रे, यु.आय.तांबोळी,आय.ए.शेख, ए.एस.शेख, ए.एन.धुळगुंडे, आर.आर.शेळके, एन.व्ही.मद्देवाड, जे.जी.शेख, व्ही,आर, पाटील,पी.एस.सांगवीकर यांच्या उपस्थित वाढदिसाच्या शुभेच्छा देण्यात आले. डाँ दासरे यांचे कोविड काळातील उल्लेखनीय कार्य पहाता कोविड परिस्थितीत केलेला अतुलनिय सहकार्यामुळे सर्वांच्या मनात आदरयुक्त भावना संपादन करुन एक कर्तव्य दक्ष आरोग्य आधिकारी अहमदपूर तालुक्यात सेवा बजावत आहेत.अशीच वेळोवेळी आरोग्य सेवा मिळत रहावे.असे शिक्षक बांधवांनी यावेळी मनोगतातून व्यक्त केले.डाँ दासरे यांचे पुढील आयुष्य दिर्घायुषी व आरोग्य संपन्न जावेत असे सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.