पोलिसांची तत्परता; अपहरण झालेल्या ५ वर्षाच्या मुलाची तीन तासात सुटका

पोलिसांची तत्परता; अपहरण झालेल्या ५ वर्षाच्या मुलाची तीन तासात सुटका

पुणे (रफीक शेख) : बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये २ फेब्रुवारी अप्पर बिबवेवाडी येथून ज्योती धनराज साळुंखें पवननगर चाळ नं ६ शनिमंदीर जवळ बिबवेवाडी यांचा मुलगा ५ वर्ष हा चाळी मध्ये रस्त्यावरती मुलांसोबत खेळत असताना त्यास अरोपी स्वप्नील रमेश शिंदे याने जिवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याचे कडील दुचाकी वरूण पळवून घेऊन गेल्याची माहिती ज्योती साळुंखे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात येथे तक्रार दिली. मुलगा अपहरण झाल्याची माहीती प्राप्त होताच लागलीच बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक झावरे, पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर तसेच तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे यांनी घटनास्थळी भेट देवुन गुन्ह्या बाबत प्राथमिक माहीती काढुन अप्पर पोलीस आयुक्त. पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील. सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला. आरोपी स्वप्नील रमेश शिंदे याचे कुटुंबीय मित्र यांचे कडे कसुन चौकशी करून सदर भागातील सी. सी. टी.व्ही.तसेच तांत्रिक विश्लेष नाच्या आधारे बिबवेवाडी मार्केट यार्ड व स्वारगेट परिसरा मध्ये पोलीसांच्या स्वतंत्र टिम तयार करूण पूर्ण भाग पिंजुण काढण्यात आला. काकडे वस्ती येथे अंधारामध्ये पार्क केलेली वाहने चेक करीत असताना पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर . पोलीस नाईक देवकते व हवालदार देशमाने यांना ऐका रिक्षा मध्ये आरोपी हा ऐका लहान मुलासह बसलेला मिळुन आला. त्याला व मुलाला ताब्यात घेवुन मुलगा सुखरूप असल्याची खात्री करून त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन आले. आरोपीने मुलाच्या आई सोबत असलेल्या भांडणाच्या रागातुन मुलाला पळवुन नेले असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सदर मुलाची आई मॉल मध्ये नोकरी करून ती एकटीच त्या मुलाचा संभाळ करीत आहे. आरोपी याने दुपार पासुन पाळत ठेवुन मुलास घरासमोर खेळत असताना त्यास चॉकलेट देवुन दुचाकी वरून पळवून नेले होते. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक काळुखे करीत आहे.

About The Author